प्रेमाचा कल्लोळ


 तुझ्या प्रेमात झालो, मी कित्तेकदा वेळा 

     एक नाही , दोन नाही , हजारो वेळा

      तरी नाही संपला तुझ्या प्रेमाचा लळा


         तुझ्या प्रेमाची ती सुरवात 

   जणु चंन्द्रतारे , आजही एकसाथ

     मग आपल्यातच का दुरावा ?

एक नाही , दोन नाही , हजारो वेळा

तरी नाही संपला तुझ्या प्रेमाचा लळा 


           तुझी ती वेगळीच दुनिया...

             एक वेगळीच अदा 

कीती दा करुन घेतली काळजाचीच मजा 

  एक नाही , दोन नाही , हजारो वेळा

  तरी नाही संपला तुझ्या प्रेमाचा लळा


 आज.  मी प्रेमात जरी हरलो 

मात्र स्वप्नात तुझ्या आयुश्य जगलो

एक नाही , दोन नाही , हजारो वेळा ..

तरी नाही संपला तुझ्या प्रेमाचा लळा...               

                   - सागर रा. खेकरे

Post a Comment

0 Comments