वऱ्हाडी हास्य कविता...😂


कोरोणा
चा हीला बळी


यंदा मले तिसाव् लागलं होत

दाढी सोबत आता मिसुर ही फुटु लागल होत

 मले काय माईत हाेतं ,

माय वयात येणं, तुले जरा ही आवडल न्होतं

काय लेका कोरोणा त्या कहर च केला

वयात आलेल्या पोट्यायचा जरा ही विचार नई केला 


तिसाव वय म्हणजे राजा उसळत रक्त

हनुमानजी ले सोडुन होते क्रिष्णाचे भक्त

साळी वाली बाई दिसली की गालात हसंण

 अन रात-रातभर जांगण

काय लेका कोरोणा त्या कहर च केला

वयात आलेल्या पोट्यायचा जरा विचार नई केला


मार्च झाला एप्रिल झाला, आता मे झाला सुरु

फेब्रुवारीतच करुण टाकेले होते म्या भांडे कपडे सुरु

पत्रिका त छापल्या च न्होत्या , फोन च केले होते सु्रु

आता नई होत राजा सहण तु कई करतं सुरु

काय लेका कोरोणा त्या कहर च केला

वयात आलेल्या पोट्यायचा जरा ही विचार नई केला


  ऊमरावतीची ची वधु अन नांदगावचा वर

 आता माय मन होउन रायल भाै खालीवर

भारत झाला महाराष्ट्र झाला,आता झाली जिल्हा बंदी

 आता कराले नको लावु राजा फक्त नसबंदी

काय लेका कोरोणा त्या कहर च केला

वयात आलेल्या पोट्यायचा जरा ही विचार नई केला


                                                    - सागर खेकरे 

Post a Comment

0 Comments